भगवद्गीता - अध्याय १८ (२)

  • 2.3k
  • 1
  • 857

भगवद्गीता अ.१८-२हे धनंजया, मी आता तुला गुणांनुसार बुद्धि आणि धैर्याचे जे तीन प्रकार होतात ते सांगतो. उचित, अनुचित कार्य कोणते, काय करावे काय करू नये, भय आणि धैर्यामधील फरक, मोक्ष, यांची जाणीव असते ती सात्विक बुद्धि.हे अर्जुना, जी धर्म ,अधर्म कोणता, योग्य -अयोग्य कार्य कोणते ते जाणत नाही ती राजस बुद्धि समज.मोहाने आणि अज्ञानाने भ्रमित झालेली, धर्माला अधर्म समजते, सर्व गोष्टीत उलटा समज करून घेते व चुकीच्या मार्गाला जायला लावते ती तामसी बुद्धि समजावी. मन, प्राण व इंद्रियांच्या क्रियांवर संयम राखणारी, धैर्याने व योग अभ्यासाने धारण केलेली व विचारांपासून न ढळणारी अशी स्थिर बुद्धि सात्त्विक समजावी. हे अर्जुना ! जी