किमयागार - 34

  • 2.2k
  • 1.1k

किमयागार -ओॲसिसकडे परत - Girishकाय घडेल ते मी तुला सांगतो.तू ओॲसिसचा सल्लागार होशील. तुझ्याकडे खुप मेंढ्या व उंट घेण्याइतके सोने असेल.तू फातिमाशी लग्न करशील.एक वर्षे तुम्ही आनंदाने संसार कराल.तू पन्नास हजार खजुराच्या वृक्षामधील सर्वांना ओळखू लागशील. तुला जग कसे बदलते ते दिसेल. तू अधिकाधिक शकून ओळखू लागशील कारण वाळवंट हेच मोठे शिक्षक आहे. दुसऱ्या वर्षी तुला खजिन्याची आठवण होईल. शकून दिसू लागतील पण तू तिकडे दुर्लक्ष करशील.ओॲसिसच्या रहिवाशांप्रमाणे तू युद्ध विद्येचे ज्ञान वापरशील. टोळी प्रमुख तुझी स्तुती करतील. आणि तुझे उंट तुला पैसा व सत्ता देतील. तिसऱ्या वर्षीही तुझे भाग्य आजमावण्यासाठीचे शकुन तुला दिसतील.तू वाळवंटात फिरत राहशील आणि फातिमाला तुझे