भगवद्गीता - अध्याय १८ (१)

  • 2.3k
  • 2
  • 921

भगवद्गीता - १८- मोक्षसंन्यास योग.अर्जुन म्हणाला, हे महाबाहो ! केशी राक्षसाचा वध करणाऱ्या श्रीकृष्णा, मला संन्यास व त्याग यांची तत्वे जाणून घ्यायची इच्छा आहे.श्री भगवान म्हणाले , ज्ञानी लोक कर्म फलाच्या त्यागाला त्याग म्हणतात. फलाच्या आशेने केलेल्या कर्माचा त्याग म्हणजे संन्यास असे म्हणतात. कांहीं ज्ञानी लोक सर्व सकाम कर्माना त्याज्य मानतात. पण कांहीं विद्वान यज्ञ, दान, तप अशी कर्मे करावीत असे म्हणतात. हे भरतश्रेष्ठा ! आता माझा निर्णय ऐक. हे नरोत्तमा ! त्याग तीन प्रकारचा सांगितला आहे. यज्ञ, दान, तप ही तीन कर्मे केलीचं पाहिजेत. ज्ञानी लोक ही यज्ञ, तप, दान करून पवित्र होतात. माझे असे निश्चित मत आहे की