इ व्हि एम सेटींग नसतंच?

  • 2.1k
  • 804

इ व्हि एम मशीन सेटींग होवूच शकत नाही? अलिकडील काळात इ व्ही एम मशीन बेकायदेशीर असल्याचं मत भाजप आणि मित्र पक्ष जर सोडला तर सर्वच राजकीय पक्ष मांडतात. तसं पाहिल्यास २०१४ पासून भाजप सतत सत्तेवर येताच सर्व राजकीय पक्ष त्यात षडयंत्र असल्याचं कबूल करतात. म्हणतात की इस व्ही एम द्वारे मतदान सुरु असतांना मशीन हॅक केली जाते. तसा युक्तीवाद विरोधी पक्ष नेहमी व सातत्यानं करीत असतात. परंतु खरा विचार करायचा झाल्यास इ व्ही एम मशीन हॅक करता येवू शकते काय? किंवा त्या मशीनीत निदान फेरफार तरी? हं, काही लोकांचं म्हणणं असं आहे की त्या मशीनीत काहीही करता येवू शकतं.