सेल्फी विषयी…

  • 16.1k
  • 4.6k

           अरविंद जगताप लिखीत व सकाळ प्रकाशनाकडून प्रकाशित झालेलं बहुचर्चित ‘सेल्फी’ हे पुस्तक वाचून पूर्ण झालं. त्या पुस्तकातील प्रत्येक वाक्य मनाला स्पर्श करुन जातं. भाजलेल्या मनावर हळुवार फुंकर घालून जातं. वाचता-वाचता वाचक काही वेळ थांबतो आणि पुस्तकातील वाक्यांवर थोडावेळ का होईना विचार करतो. लेखकाने प्रस्तुत पुस्तकात वाक्यांची खूपच छान पेरणी केली आहे. पुस्तकातील माझ्या मनाला भावलेली काही वाक्य पुढे नमूद करत आहे. त्यातीलच एक वाक्य पहा. ‘स्वतः मध्ये डोकावत राहिलं पाहिजे. माणूस एकटा पडत नाही.’