मायबाप आदर्श असावेत?

  • 2.5k
  • 1.1k

मायबाप आदर्श असावेत? अलिकडे आपण पाहतो की मुलं मायबापाची सेवा करीत नाहीत. त्या मायबापांना त्यांची मुलं चक्कं वृद्धाश्रमात पाठवतात. शिवाय आजच्या काळात त्यांचं बोलणंही ऐकून घेत नाहीत. कोणी याला कुसंस्कार असं नाव दिलेलं आहे. लोकांचं म्हणणं असं की जे मायबाप मुलांवर संस्कार करीत नाहीत, कुसंस्कार करतात. त्यांची मुलं अशी वात्रट निघतात. जी मायबापाची सेवा करीत नाहीत. मायबापाला वृद्धाश्रमात पाठवतात. वरील स्वरुपाचं मुलांचं वागणं पाहिलं की आपल्याला त्यात मुलांचा वात्रटपणा दिसतो ती परिस्थिती पाहून दयाही येते आणि विचारही येतो की मुलं अशी का वागत असावीत. परंतू त्यावेळी मुलांचं चूकत असेल का? त्याचं उत्तर नाही असच आहे. महत्वाचं म्हणजे मायबाप मुलांवर कुसंस्कार