पुर्वीच्या शिक्षा कामाच्या होत्या काय

  • 2.3k
  • 861

पुर्वीच्या शिक्षा कामाच्या होत्या काय? अलीकडे शाळेत शिकवितांना विद्यार्थ्यांना मारता येत नाही. तसंच न मारता त्यांना चांगलं शिकवावं लागतं. जे शक्य होत नाही. तरीही आपला विद्यार्थी चांगला घडावा. म्हणून त्याला न मारता शिकवावं लागतं. तसं पाहता ती तारेवरची कसरतच असते. आम्ही जेव्हा लहान होतो, तेव्हा आमच्यावर आमच्या गुरुजींचा धाक असायचा. गुरुजी आम्हाला शिक्षा करायचे. त्या शिक्षेत आम्हाला कोंबडा बनवणे, बाकावर उभे राहणे, अंगठे धरुन राहणे, कान पकडून उभे राहणे, तोंडावर बोट ठेवणे, भिंतीकडे तोंड करुन उभे राहणे, वर्गाबाहेर उभे राहणे, गुडघे टेकवणे, हात वर करुन उभे राहणे, कोणताही पाठ दहा वेळा वाचणे, शाळा सुटल्यावर थांबणे, वर्ग स्वच्छ करणे, उठबैठका काढणे,