बालपण देगा देवा

  • 3k
  • 1.2k

बालपण देगा देवा बालपण माणसाला फार आवडत असते. कारण बालपण एकदाच मिळत असते आणि ते रम्य असते. अलिकडे मोबाईलचा काळ अाहे. या काळात लहान मुलं ही खेळण्याऐवजी फक्त मोबाईल पाहण्यात जास्त वेळ घालवत असतात. या लहान मुलांच्या मोबाईल खेळण्याच्या नादामुळं त्यांचे मायबापच नाही तर लहान मुलंही जास्त परेशान असतात. ते लहान मुलांवर ओरडतात. तरीही ते ऐकायला तयार नसतात. तरीही ते अल्लड जीवन सर्वांना आवडत असतं. आम्ही जेव्हा लहान होतो. जेव्हा आम्हाला कोणी आमच्यावर ओरडलेलं आवडत नसे. आम्हाला त्यावेळी असं वाटायचं की मोठेपण चांगलं असतं. परंतू आम्ही जेव्हा मोठे झालो आणि जेव्हा आमच्यावर जबाबदारी आली. तेव्हा कळलं की मोठेपण चांगलं नाही