गुप्तधन नको गं बाई

  • 2.6k
  • 897

गुप्तधन ; नको गं बाई आज जसजसा तंत्राच्या शोध लागत आहे. तसंतसं जग विज्ञानयुगाकडे वाटचाल करीत आहेत. त्यातच गुप्तधन प्राप्त होणं वा ते करणं या भ्रामक कल्पना. तरीही बरेच लोकं आजही गुप्त धनाच्या मागं लागतात व आपला संसार उध्वस्त करुन बसतात. कजली हा असाच प्रकार आहे. गुप्तधन काढण्याचा. या प्रकारानुसार तांत्रिक लोकं जमिनीच्या खोलवर भागातून तंत्र आणि मंत्राच्या सहाय्यानं गुप्त धन बोलावत असतात आणि त्याला बाहेर काढून मालामाल होत असतात. म्हणतात की हे धन मिळतं परंतू त्यासाठी साधकानं त्या धन काढण्याच्या जागेवर काहीतरी नरबळी अवश्य द्यावा. कोणी कोंबड्या बक-याचा बळी द्यावा असंही सांगतात. गुप्तधन मिळवणं ही भ्रामक कल्पना असली तरी