भारतीय संविधान त्यागाचं स्वरुप

  • 2.6k
  • 969

भारतीय संविधान; त्यागाचं स्वरूप! संविधान सव्वीस नोव्हेंबर १९४९ ला लिहून पुर्ण झालं. ते लिहिणं भाग होतं. कारण संपूर्ण देशाचा कारभार चालवायचा होता. तसं पाहता देश काही लहान नव्हताच की ते चालवायला काही नियम लागणार नाही. संविधानाला राज्यघटना असे म्हणतात. ही राज्यघटना बनविण्याचे काम जोखमीचे काम होते. त्यातच देशाला व्यवस्थीत नियमांची गरज होती. जी गरज देश विनाकायदेतज्ञानं पुर्ण करता येत नव्हती. देश पर्याय शोधत होता. देशात कोण कोण तशी राज्यघटना लिहिणारे कायदेपंडीत आहेत. देश संविधान लिहिण्यासाठी कायदेपंडीतांचा शोध घेत असतांना त्यांना देशात एवढी शिकलेली मातब्बर मंडळी असूनदेखील देशाचं लक्ष त्यांच्याकडे गेलं नाही. त्यामुळं त्यांनी त्या इतर देशातील लिहिणारे कायदेपंडीत शोधण्याचा निर्णय