आम्ही पस्तीस टक्के वाले नुकताच दहावी बारावीचा निकाल लागला व गुणवत्ता यादी जाहीर झाली. त्या यादीनुसार गुणवत्ता यादीत मुलांची नावं झळकली. ही गुणवत्ता यादी जशी स्टेट बोर्डातील झळकली, तशीच ती सी बी एस सी चीही झळकली. त्यातच ही गुणवत्ता यादी काही विद्यालय महाविद्यालयांनी तर झळकवलीच. व्यतिरीक्त ही गुणवत्ता यादी काही मातब्बर शिकवणी वर्गानंही झळकवली. त्यावरुन ती यादी पाहिली असता विचार आला आणि प्रश्न पडला की कोण होते या गुणवत्ता यादीत? या गुणवत्ता यादीत होते अगदी श्रीमंतांची मुलं. जी कितीतरी प्रमाणात गुणवत्ता यादीत आपल्या मुलाला आणण्यासाठी पैसा खर्च करीत असतात. लाखो रुपयाच्या शिकवण्या लावून देतात. कितीतरी पैसा त्या मुलांच्या शिकविण्यावर खर्च