पालकांनो सावधान

  • 3.1k
  • 1.1k

*पालकांनी सावध राहून मुलांना घडवावं**सावधान पालक सुरक्षीत मुलं* अलिकडं कोण कसा निघेल हे काही सांगता येत नाही. आज आदर्शपण उरलेलं नाही. त्यातच स्वार्थ एवढा बळावला आहे की कोणीही समाजसेवा करायला पाहात नाही. मायबापाचं मुलं तेवढंच ऐकतात. जेवढं त्यांना खपतं. अलिकडे मुलं एवढी वात्रट झालेली आहेत की ती तसूभरही मायबापाचं ऐकत नाहीत. ती मायबापाच्या तोंडाला तोंड देत असतात. त्यांचं काय करावं तेही सुचत नाही. मुलांबाबतीत सांगायचं झाल्यास मुलं वात्रट झालेली आहेत असं म्हणण्यापेक्षा ती वात्रट बनवली गेली आहेत असं म्हणणं जास्त सोयीस्कर होईल. ती कोणं बनवली? या प्रश्नाचा शोध घेतांना एक कारण नक्कीच पुढं येते. ते म्हणजे पालक. पालक आपल्या मुलांवर