नराधम पिसाळले

  • 2.9k
  • 1.2k

सावधान;नराधम पिसाळले आहेत चौदा सप्टेंबरचा तो दिवस.उत्तरप्रदेशातील हाथरस येथील ती तरुणी.त्या तरुणीचं वय होतं एकोणवीस.शेतीवर चारा कापण्यासाठी गेलेली.त्यातच तिच्यावर बलत्कार करुन तिला शेतात फेकलं.हाथरसची शाई वाळते न वाळते तोच बलरामपूरलाही तशीच घटना झाली.वय वर्ष बावीस. शिक्षणाच्या प्रवाहात असलेली तरुणी.बहुतेक ती बी कॉमचा फॉम भरायला जात होती.तिला इंजेक्शन देवून बेशुद्ध केलं गेलं. हाथरसमध्ये काही तरुणांनी तिला पकडून तिच्यावर बलत्कार केला.त्यातच ती त्या तरुणांना ओळखत असल्यानं तिनं कोणाला सांगू नये.तसेच चालत चालत पोलिस कार्यालयात तसेच कुठेच जावू नये म्हणून तिची जीभ कापली.तसेच तिचे हातपाय व कंबरडे मोडले.तिच्या शरीरातील अंतर्गत व बाह्य भागावर जखमा केल्या.त्यातच कुठेतरी जबर दुखापत झाल्यानं तिला नंतर लकवाही मारला.तिला