पोळा आणि पाऊस

  • 2.5k
  • 1.1k

पोळा आणि पाऊस ते रामपूर नावाचं गाव. त्या गावात महादेव नावाचा एक शेतकरी राहात होता. तो आपली पत्नी शिला व दोन लहान मुलासमवेत खुश होता. अगदी गुण्यागोविंदानं तो मुलांच्या व आपल्या पत्नीच्या इच्छा पुरवीत असे. गाव तसं पाहिल्यास जंगलात होतं. सह्यांद्रीच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेलं ते गाव. सह्यांद्रीला वारे अडून दरवर्षी पाऊस यायचा. तो मोजता यायचा नाही. त्यातच दरड कोसळणे व ओढ्याला पूर येणे. त्यातच त्या ओढ्यातून माणसं वाहून जाणे इत्यादी घटना नेहमी होत असायच्या. आज पाऊस सुरु होता. पावसाची संततधार पाहून शिलाला विचार येत होता. दोन्ही मुलं तिच्या भोवताल तिला चिपकून बसली होती. त्यातच तिला काय करावं सुचत नव्हतं. आज