पाऊस मित्र की शत्रू

  • 2.3k
  • 864

पाऊस; आमचा मित्र की शत्रूसारखा! पावसाळा सुरु आहे. श्रावण महिना अद्याप लागला नाही. बाहेर टिपटिप पाऊस पडत आहे. काळेकुट्ट मेघ आकाशात दिसत आहे. तसा कधीकधी वीजेचा कडकडाटही ऐकू येत आहे. त्यातच पावसाच्या धाराही येत अाहेत. पुर्वी काही दिवसपर्यंत दडी मारुन बसलेला पाऊस दोन दिवसापासून चांगला मुसळधार कोसळत असल्यासारखा दिसत असून या दोन दिवसात अगदी शेतक-यांना दिलासा देण्यालायक पाऊस झालेला आहे. त्यातच यावेळी आलेल्या पावसानं शेतकरीच नाही तर त्याची पीकही आनंदित झालेली आहेत. आज मुख्यतः खरी गरज आहे ती पावसाची. पाऊस नसेल तर पीकं पीकू शकत नाहीत. ती पेरताच येवू शकत नाहीत आणि ती पिकली नाहीत तर दुष्काळ निर्माण होवू शकतो.