आता न्याय मिळत नाही?

  • 2.3k
  • 987

आज अन्यायाविरुद्ध दादही मागता येत नाही! आज अन्यायाविरुद्ध दादही मागता येत नाही. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण देशातील जनता ही गरीब आहे. त्यांच्याजवळ पुरेसा पैसा नाही. समजा अन्याय झालाच आणि त्या अन्यायाबद्दल खटला लढायचा झाल्यास तो खटला ती गरीब जनता लढू शकत नाही. कारण देशात भारदस्त वकीलाची फौज आहे. जी फौज या खटल्यावर आरोपीच्या बाजूने खटले यशस्वी करुन दाखवू शकते. त्यातच अशा खटल्यात अशा वकीलाच्या मदतीने समजा विजय मिळालाच तर तोच आरोपी पैशाच्या बलबुत्यावर अशा गरीबांवर उलट खटला दायर करुन त्यांना परेशान करीत असतो हे तेवढंच खरं आहे. आज देशात अशा प्रकारचे अनेक खटले आहेत की जे प्रलंबीत आहेत.