मराठी शाळा बंद पडणार काय

  • 2.4k
  • 1k

मराठी शाळा बंद पडणार काय? मराठी माध्यमाच्या शाळा आज ओस पडत चाललेल्या आहेत. पटसंख्या कमी होत चाललेली आहे. त्यातच शिक्षकांना चिंता लागलेली आहे की मराठी शाळा बंद होणार तर नाही. सगळा विद्यार्थ्यांचा ओंढा मराठी माध्यमाकडे न झुकता तो इंग्रजी माध्यमाकडे जातांना दिसत आहे. त्यातच शिक्षकांची वणवण भटकंती वाढलेली आहे. तसेच आपली शाळा टिकावी यासाठी स्पर्धेची चढाओढ लागलेली असून एका एका विद्यार्थ्यांसाठी शिक्षक तसेच मुख्याध्यापक रस्सीखेचणीचा खेळ खेळत आहेत नव्हे तर एक एक विद्यार्थी मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. मराठी शाळा बंद पडणार की काय, अशी भीती आज निर्माण झालेली असून जो तो काँन्व्हेंटच्या पाठीमागे लागत आहे. त्यातच सरकारनंही काँन्व्हेंटमध्ये मराठीचा