शिक्षक करतो देशाचा विकास

  • 2.4k
  • 945

शिक्षकच करतो देशाचा विकास! अलिकडे शिक्षणाला फार महत्व आले आहे. परंतू शिक्षकाला तेवढे महत्व आलेले दिसत नाही. जो शिक्षक आपल्या हाडाचं, रक्तामासाचं पाणी करीत विद्यार्थ्यांना शिकवतो. त्या शिक्षकाला लोकं मात्र आज नावबोटं ठेवतांना दिसतात. पुर्वी शिक्षकाला इज्जत मिळायची. त्यांचा विशेष असा रुतबा होता. त्या काळचे राजेही न्यायदान करतांना आपल्या न्यायदान प्रसंगी अशा शिक्षकांचा सल्ला देत. ते राजे शिक्षक म्हातारे होताच व त्यांना जेव्हा शिकवणं जमायचं नाही. तेव्हा त्यांची पदोन्नती करुन त्यांना दरबारात सल्लागाराची जागा देत. ज्या सल्लागाराला कोणतीच कामं नसायची. ते फक्त आणि फक्त सल्ला देत. रामायणातील गुरु वशिष्ठाचा उल्लेख इथे आवर्जून करतो. त्यांनीच तरुणपणात रामासह त्याच्या तीनही भावंडांना शिकवलं