सृष्टीनंच दिले जगण्याचे सुत्र

  • 3k
  • 1
  • 1.1k

सृष्टीनंच दिले जगण्याचे सुत्र माणसाचं जीवन दुःखानं भरलेलं आहे. तो एकटा या पृथ्वी वर आला आणि एकटाच जाणार आहे. त्यातच दुःख ही त्याला एकटच झेलावं लागतं. अशावेळी तो खचून जावू नये म्हणून त्याला गोतावळा दिला. तसंच पशूपक्षी वनस्पतीही शिकवतात जगण्याचं सुत्र. जगणं आनंददायी व्हावं म्हणून. माणूस जन्माला येतो. त्यातच त्याचं पालनपोषण त्याचे मायबाप करीत असतात. अशावेळी तो जेव्हा थोडा मोठा होतो. तेव्हा त्यानं या जगात रमावं म्हणून त्याला मायबाप मिळतात. त्यानंतर मित्रपरीवारही. तो थोडासा मोठा झाला की त्याचा विरंगुळा व्हावा, म्हणून सृष्टी हळूहळू त्याचे सवंगडी वाढवीत असते. त्यातच या वयात त्याला गुरु मिळतात. शाळेतील मित्र मैत्रीणी मिळतात. तो आणखी थोडा