चांगले पेरा चांगलेच उगवेल

  • 2.8k
  • 1.1k

चांगले पेरा, चांगलेच उगवेल आयुष्य खुप सुंदर असते. पण ते आपण कसे घडवतो यावर अवलंबून असते. आपण चांगले कर्म केले तर चांगलंच आयुष्य आपल्याला मिळतं आणि वाईट केल्यास वाईट. चांगले वागलो तर आपले आयुष्यही चांगले घडते आणि आपण वाईट वागलो तर आपले आषुष्यही वाईट बनते. उदाहरण द्यायचं झालंच तर आपल्याला दोन मुलींचं उदाहरण देता येईल. पहिला प्रसंग सुवर्णाचा. एक सुवर्णा नावाची मुलगी. ती महाविद्यालयात शिकली. त्यातच तिनं ऐन परीक्षेच्या काळात एका गरीब मुलाला मदत केली. त्याला परीक्षेच्या काळातच पुस्तकं पुरवली अभ्यासाला. आपल्या अभ्यासाचा विचार न करता. तसं पाहता ती श्रीमंत असल्यानं तिनं नोट्समधून अभ्यास केला. त्यातच वर्षाशेवटी ज्या परीक्षा झाल्या.