प्रत्येकांनी आपलं वागणं सुधरावं

  • 3.3k
  • 1.2k

प्रत्येकानं आपलं वागणं सुधारावं. काही काही माणसं अशी असतात की त्यांच्यासमोर कितीही वाईट परीस्थीती आली तरी ते हिंमतीनं सामोरे जातात. विपरीत परीस्थीतीत स्वतःचा तोल जावू देत नाहीत. तर काही माणसं अशी असतात की जे विपरीत परीस्थीती येताच आपला तोल ढासळतात. काही माणसं हे क्षणीक सुखाचे भागीदार असतात. अशी माणसं ही चापलुसी करीत असतात. संभवतः जसे दिवस आले. तसा आपला लबाडीपणा दाखवतात. व्यक्तीपरत्वे प्रत्येकाचा स्वभावगुण ठरलेला असतो. त्या त्या स्वभावानुसार ते तसे बदलत असतात. महत्वाचं म्हणजे प्रत्येकानं आपलं वागणं सुधारण्याची गरज आहे. काही माणसं अशीही असतात की जे थोडंसं संकट आलं की घाबरुन गप्प पडून राहतात. ते संधीची वाट पाहात असतात.