किमयागार - 29

  • 2.1k
  • 942

किमयागार -जाणिव त्याला या युद्धाच्या कल्पनेत रमण्यापेक्षा प्रेमाच्या कल्पनेत रमावे असे वाटत होते. तो गुलाबी वाळू व वाळवंटातील दगडांवर लक्ष केंद्रीत करू पाहत होता पण त्याच्या मनाच्या कोपऱ्यात प्रेमामुळे निर्माण झालेली मृदू भावना त्याला तसे करू देत नव्हती.त्याच्या मनात आले, राजा म्हणाला होता, शकुनांकडे काळजीपूर्वक अवधान ठेवावे. आपण जे काही स्वप्न पाहू ते प्रत्यक्षात येत असतेचं. तो उठून खजुराच्या झाडांकडे परतीच्या मार्गावर चालू लागला. त्याला जाणवले की, प्रत्येक गोष्टीचा अर्थ दरवेळी बदलत असतो. आता यावेळी वाळवंट सुरक्षित व ओॲसिस भितीदायक बनले होते. उंटचालक एका खजुराच्या झाडाखाली बसून सूर्यास्त पहात होता. त्याने तरुणाला येताना पाहिले. तरुण त्याला म्हणाला, सैन्य येत आहे.