प्रेम म्हणजे काय

  • 2.2k
  • 834

यालाच प्रेम म्हणावे काय? प्रेम आंधळं असतं........प्रेम आंधळं बनायला लावतं. हे खरंच आहे. अलिकडे प्रेमाला फार महत्व आहे. कारण जीवनात प्रेम जर नसेल तर माणसं जगू शकणार नाहीत. ती जीवंत असली तरी त्यांची अवस्था मेलेल्या मुदड्यागत होईल यात काहीच शंका नाही. आज जग प्रेमावरच आधारलेले आहे. प्रेम द्यावे व प्रेम घ्यावे. परंतू आज प्रेम निःस्वार्थपणे करीत नाहीत लोकं. लोकं प्रेमाला स्वार्थाच्या कक्षेत मोजत असतात. प्रेम काही एकाच प्रकारचं नसतं. प्रेम हे देवावरचं असू शकतं. प्रेम मायबापावरचं असू शकतं. बहिणीवरचं असू शकतं. तसेच एखाद्या मैत्रीणीवरचं असू शकतं. परंतू आपल्याला फक्त एकच प्रेम कळतं. ते म्हणजे आपलं प्रेयसीवरचं प्रेम. तेच जगात सर्वात