परंपरा

  • 3.7k
  • 1.5k

आज सायली सकाळ पासून अस्वस्थ च होती. आठ दिवसांवर दिवाळी आली, पण दिवाळीच्या तयारीत तीच मन च लागत नव्हतं. आणि त्यात, मुलं ही मागे लागले होते. बाजारात जाऊन कपडे,फटाके, दिवाळीची खरेदी करू? म्हणून. मुलांचा हट्ट. पण दरवर्षी प्रमाणे सायली उत्साही नव्हती.का कोणास ठाऊक आज तीच मन जुन्या आठवणीत च रमुन गेलं, पहिला दिवाळ सण.....तिच्या डोळ्या समोर सगळ्या आठवणी एक एक करत येऊ लागल्या. लग्ना नंतर ती ची ही पहिली दिवाली, सासूबाई सोबत, खरेदी करायला खूप उत्साहाने बाजारात गेली होती,सगळ्यांच्या आवड निवड लक्षात घेऊन खरेदी केली. कोणाला काय हवं . ते सगळ सासूबाई घेतलं.पण मला काय आवडत?विचारलं च नाही.माझ्यासाठी म्हणून काहीच