जोसेफाईन - 5

  • 6.2k
  • 3.7k

सुमित आणि सुपर्णा बाहेर डिनर साठी निघून गेले. घरात पुन्हा काहीतरी ठोकण्याचा आवाज सुरु झाला.डिनर आटोपून सुमित सुपर्णा लॉन्ग ड्राईव्ह साठी गेले. ते झाल्यावर घरी यायला त्यांना अकराचं वाजले. दुसऱ्या दिवशी सुट्टीच असल्याने ते निवांत होते. झोपे झोपेपर्यंत रात्रीचे बारा वाजले. सुपरणा तर गाढ झोपी गेली पण नवीन ठिकाणी सुमितला काही केल्या झोप येईना. तो या कुशीवरून त्या कुशीवर वळत होता. थोड्या वेळाने थोडी मोकळी हवा खावी ह्या विचाराने तो त्यांच्या बेडरूम च्या बाल्कनीत मोकळी हवा खायला उभा राहिला.सगळीकडे मस्त वातावरण होते, छान हवा सुटली होती. आकाशात चंद्र चांदण्या लुकलूकत होत्या. सुमित मस्त शीळ घालत इकडे तिकडे बघत होता तेवढ्यात......एका