सायलेन्स प्लीज - प्रकरण 18 - (शेवटचे प्रकरण)

  • 5.4k
  • 2.8k

प्रकरण अठरा शेवटचे प्रकरण “ कोर्टाचं कामकाज कालच्या पुढे आज सुरु करावं.” न्या.वज्रम म्हणाले. “ मला वाटतं दुर्वास याची उलट तपासणी चालू होती ; मिस्टर दुर्वास, असे पुढे या आणि तुम्हाला विचारले जातील त्या प्रश्नांची उत्तरे द्या.” दुर्वास पिंजऱ्यात आला.आपल्या साक्षीला विलक्षण महत्व आहे याची जाणीव असल्याने तो जास्तीत जास्त भाव खात होता. “ मला एखाद-दुसरा च प्रश्न विचारायचा आहे.” दुर्वास पिंजऱ्यात येताच पाणिनी म्हणाला. “ मला वाटतंय की काल तुम्ही साक्ष देताना असं म्हणाला होतात की तुमचं अशील मरुद्गण याच्याशी तुम्ही रात्री अकरा वाजता बोललात आणि नंतर झोपायला गेलात. बरोबर ? ” पाणिनी म्हणाला. “ हो साधारण अकराच्या दरम्यान.”