सायलेन्स प्लीज - प्रकरण 16

  • 4.3k
  • 2.5k

प्रकरण १६न्यायाधीश.वज्रम स्थानापन्न झाले होते.धूर्त आणि माणसांच्या स्वभावाचा अभ्यासक अशी त्यांची ख्याती होती.त्यांच्या समोर हेरंभ खांडेकर , सरकारी वकील.जाड जूड धाटणीचे.रुंद छाती,जाड मान, ते बसले की उगाचच दोन तीन माणसांची जागा अडवाल्यासारखे बसत. समोर बसलेल्या पाणिनी पटवर्धन कडे ते खाऊ की गिळू नजरेने बघत होते, धावण्याच्या स्पर्धेत आपण कायम पुढे आहोत याची जाणीव असणारा धावपटू ज्या विश्वासाने पळत असतो आणि शर्यत संपत येताना मागून येणारा धावपटू आपल्याला ओलांडून पुढे जातो आणि शर्यत जिंकतो तेव्हा हरणाऱ्याचा चेहेरा कसा होईल तशा चेहेऱ्याने ते पाणिनी कडे बघत होते.त्यांचा सहाय्यक, समीरण भोपटकर त्यांच्या बाजूलाच बसला होता.तो तरुण,शिडशिडीत,होता.आपल्या चष्म्याच्या रिबीन शी बोटाने चाळा करत होता.पटवर्धन