भगवद्गीता - अध्याय १०

  • 2.9k
  • 1.5k

१० विभूति योग. श्री भगवान म्हणाले, हे प्रिय महाबाहो, माझे हे तुझ्या हितासाठी सांगत असलेले अनमोल असे ज्ञान पुन्हा ऐक.देवता, महर्षी माझा उद्भव जाणत नाहीत कारण देवता व महर्षींचा उद्भव माझ्या ठायी आहे. त्यांचे आदिकारण मी आहे.अनादि, जन्मरहित व सर्वेश्व़र अशा मला जो मनुष्य मला जो जाणतो तो पाप मुक्त होतो. प्राणिमात्रांचे सर्व भाव जसे की मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह, क्षमा, सत्य,सुख आणि दुःख, जन्म मृत्यू, अहिंसा, समता, समाधान, तप, दान, यश अपयश, बुद्धि, निर्मोहता, ज्ञान, तसेच संशय, भया पासुन मुक्ति इत्यादि वृत्ति माझ्या पासुन उत्पन्न होतात. सात ऋषी तसेच त्यापुर्वीचे चार महर्षि व मनुंचा जन्म माझ्या मुळे झाला आहे व