भगवद्गीता - अध्याय ९

  • 3.9k
  • 2k

भगवद्गीता अध्याय ९वा.मी हे सर्व जग व्यापले आहे, पण त्यात न दिसता. सर्व भूतमात्रांच्यात मी आहे पण मी त्यांच्यांत नाही. माझे योग ऐश्वर्य पहा. हे सर्व विश्व माझ्या ठायी आहे. हे सर्व जग माझाच विस्तार आहे. वारा सर्वत्र वाहात असतो तरी नभात असतो तसे सर्व भूतमात्र माझ्यात राहतात. कल्पाचा अंत होतो तेव्हा सर्व माझ्यात विलीन होतात. व कल्पाचा आरंभ होतो तेव्हा मी सर्व भूतमात्रांना मी निर्माण करतो. मी ही कर्मे करीत असलो तरी ती मला बद्ध करत नाहीत. मी या सर्व करण्यापासून अनासक्त, अलिप्त असतो. सर्व भौतिक सृष्टि माझ्या अधिन आहे. माझ्या इच्छेनुसार तीची उत्पत्ति होत व नाश होत असतो.माझ्या