लीला

  • 10.8k
  • 3
  • 4k

लीलाला जुन्या इस्पितळात रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणे कधीच आवडले नव्हते. तिला नेहमी काळोख्या आणि शांत कॉरिडॉरमधून चालताना अस्वस्थ वाटायचे, विशेषत: जो कॉरिडॉर वर्षानुवर्षे बंद असलेल्या विंग ला जोडायचा त्या कॉरिडॉर कडे तर ती फिरकायची पण नाही. बऱ्याच वर्षांपूर्वी त्या विंग ला आग लागली होती आणि त्यामध्ये अनेक रुग्ण आणि कर्मचारी सदस्यांचा मृत्यू झाला होता तेव्हापासून ती विंग बंद होती. अशा अफवां पसरल्या होत्या की विंगला पीडितांच्या अस्वस्थ आत्म्यांनी पछाडले आहे आणि विचित्र आवाज आणि दृश्ये काही लोकांनी ऐकल्याची आणि पाहिल्याचा ऐकिवात होता.लीलाचा भुतांवर तसा विश्वास नव्हता, पण तरीही तिने शक्य तितके त्या विंग कडे जाणे टाळले होते. तिने तिच्या सहकाऱ्यांकडून