कथासंग्रह

  • 3.6k
  • 1.6k

१)खावटी बाहेर पावसाची सारखी रिपरिप सुरु होती.धरणी न्हाऊन तृप्त झाली होती.हवेत गारवा निर्माण झाला होता.तृणाकूरही धरणीतून डोकं काढून बाहेर आले होते.तरीपण त्याचे पाय जमीनीतच होते.पक्षी किलबिल करीत होते.पण पावसात भिजल्यानं गारठले असल्यानं आपल्या जोडीदारासमवेत अगदी निगरगट्ट राहून बसले होते.तसं त्याच्या जोडीदारांनाही हायसं वाटत होतं. बाहेर पाऊस पडत असल्यानं सगळी माणसंही आपआपल्या घरातच होती.कोणाची भार्या भजी तळत होती.तर कुणाची भार्या पापड.पाऊस सुरु असतांना आलेल्या सुगंधावरुन हे सगळं कळत होतं.हा सुगंध त्या धरणीमाईच्या सुगंधात मिसळून गेला होता. गंगाधर आपल्या झोपडीत विचार करीत बसला होता.तो त्या पक्षांचं निरीक्षण करीत बसला होता.त्याला आपल्या पत्नीची सारखी आठवण येत होती. गंगाधर शेतकरी होता.त्याच्याजवळ चार एकड शेती