लेखक

  • 2.9k
  • 1
  • 1.4k

लेखक कादंबरी अंकुश शिंगाडे भाग १ सारखा मुसळधार पाऊस कोसळत होता.सगळं जनजीवन विस्कळीत झालं होतं.पुष्कळ प्रमाणात झाडं पडली होती. मागील वर्षीही असाच पाऊस मोठ्या प्रमाणात पडला होता.त्यात अख्खं गाव पाण्यात बुडलं होतं.तोच प्रकार आताही.पण कमी प्रमाणात.त्यातच ते गाव आज पावसाचा जोर पाहताच चूप बसलं होतं.याहीवर्षी गावच्या नदीला महापूर येईल की काय अशी शंका दिसत होती.तसेच हे पावसाचे स्वरुप कमी प्रमाणाचे असले तरी त्यात भीती मात्र लोकांना फार मोठी वाटत होतीच. सावित्री,अर्जुना,शिवगंगा,वशिष्ठी या कोकणातल्या बहुतःश नद्यांना पूर होता.अगदी दुथडी भरुन वाहात होत्या त्या नद्या.त्यातच त्या नद्या ज्या भागात वाहात होत्या.त्या भागातील नद्यांच्या किना-यावर राहणा-या लोकांना अतिशय भीती वाटत असून त्यांना रात्ररात्र