सायलेन्स प्लीज - प्रकरण 15

  • 5.1k
  • 2.8k

प्रकरण 15पाणिनी पटवर्धन, पेंढारकर च्या हार्ड वेअर च्या दुकानाचे दार उघडून आत गेला.त्याला पाहून उदित पेंढारकर ला नवलच वाटले. “ अरे पटवर्धन तुम्ही? ” तो उद्गारला.“ मस्त आहे दुकान तुझं ! ” पाणिनी म्हणाला.“ आवडलं तुम्हाला? बरं वाटलं.” उदित म्हणाला.“ कधी पासून आहे हे दुकान? ”“ फार दिवस नाही झाले. भाडयाने घेतलंय एका कडून. मला आधी इथला जुना माल काढून टाकयचाय. मग नंतर आतली दुरुस्ती, नूतनीकरण करून घ्यायचं आहे.”“ मला वाटलं स्वत:चं आहे दुकान.” पाणिनी म्हणाला.“ भाड्याचे आहे परंतू माझ्या स्वतःच्या खर्चाने काहीही दुरुस्ती करायला परवानगी आहे.”“ कधी करणार सुरुवात? ” पाणिनी म्हणाला..“ लगेचच. सवलतीच्या किंमतीत जुना सगळा माल काढून