मुलगी होणं सोपं नाही - 9 - सोबत

  • 1.7k
  • 633

बाई.. असं नका ना करु.. माई आमच्यासोबत राहीली तरी शाळेत येईल ना ती.. आम्ही पाठवु तीला रोज वेळेवर शाळेत.. वाटलं तर मी सकाळी लवकर घरातुन कामासाठी जाणार असेल तर सर्व काम आवरुन जात जाईल. माईसाठी काहीच काम ठेवणार नाही..अगं.. ताई समजुन तर घे.. विचार कर .. माई इथे राहिली तर तुमच्यासारखीच जगेल, कधी पैसे नसले तर शाळेची फी नाही भरायला जमणार तुम्हांला, खायला व्यवस्थित जेवण ही नसेल आणि मझ्यासोबत राहिली तर ती आनंदात राहील, व्यवस्थित शिकेल मोठी होईल तिला शिक्षक बनून माझ्यासारखं शाळेत शिकवायच आहे बोलत होती ती,