मार्ग

  • 2.9k
  • 1.2k

मार्ग कादंबरी-अंकुश शिंगाडे मुलं किंवा मुली जन्माला घालणं हा प्रत्येक स्री पुरुषांचाच नाही तर जीवसृष्टीचा मूलभूत हक्क आहे नव्हे तर अधिकारच. त्यातच या प्रजोत्पादनाच्या कार्यात ज्याप्रमाणे योग्य वयात आल्यावर पशूपक्षी व सुष्टीतील घटक आपल्या हातून मुलांना जन्म देतात. त्यांना मोठे करतात व ती लहानाची मोठी झाली की त्यांच्यावर अधिकार न गाजवता त्यांना त्याच्या स्वतःवर आत्मनिर्भर करुन सोडून देतात. ते जीव मग कोठेही जावो. त्यांची पर्वा करीत नाहीत. मग एखाद्यावेळी त्यांना कमीजास्त झाले तरी वा ते मृत्यू पावले तरी त्यांना बरेचदा शोक नसतोच. कारण त्यांना बुद्धी ही कमी आहे. पण मानवाचं वेगळं आहे. या माणसाला बुद्धी आहे. त्यानुसार तो विचार करीत