व्यवस्थेचा बळी

  • 3.1k
  • 1.4k

मनोगत 'व्यवस्थेचा बळी' माझ्या साहित्यातील एक अग्रगण्य कादंबरी. मला कादंबरी लिहिणं फार आवडतं. त्याच दृष्टीकोणातून मी कादंब-या लिहित आहे. याआधीही मी ब-याच कादंब-या लिहिल्या. त्यात मला चांगला प्रतिसादही मिळालेला आहे. आता ही नव्याने एक वेगळा विषय घेवून मी नवीन कादंबरी आपल्या दैनंदिन जीवनात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यातच ही कादंबरी आपल्या पसंतीस किती उतरेल हे आपणच ठरवावं. कादंबरी लेखन साहित्यीक सहसा करीत नाही. ते लेखन करणं तेवढं सोपंही नाही. कारण त्यात कस लागतो. लेखक पुर्ण ताकदीनं आपला जीव त्यात ओतून कादंबरी लेखन करतात. पण त्याच्या कादंब-या जेव्हा वाचल्या जात नाही, त्यावर जोपर्यंत फोन येत नाही, तोपर्यंत त्याला बरं वाटत नाही.