उर्मीला

  • 6.2k
  • 3
  • 2.8k

मनोगत 'उर्मीला' ही माझी साहित्य विश्वातील एक्कावनवी पुस्तक असून पंचवीसवी कादंबरी आहे. ही कादंबरी वाचकांपुढं ठेवून मी या माध्यमातून एका पौराणिक विषयाला हातात घेतलं आहे. कादंबरी फारच सुंदर झालेली असून ही कादंबरी लिहिण्याचाह विषय माझे मित्र सुनील वाडेनी सुचविला. तसेच यावर दुसरी चर्चा माझे पंढरपूरचे वाचक मित्र संतोष चौंडावार यांच्याशी झाली आणि वाटलं की आपण उर्मीला कादंबरीच्या रुपानं एक पौराणिक विषय हातात घ्यावा. ही कादंबरी लिहितांना काही अडचणीही आल्या. त्या विशेष करुन मांडाव्याशा वाटतात नव्हे तर मांडणं गरजेचं आहे. पहिली अडचण म्हणजे रामायण घडलंच नाही असे मानणा-यांची आली. कारण जे रामायण मानत नाही. त्यांच्या ग्रुपवरुन एका जवळच्या व्यक्तीनं यातील काही