शांता

  • 3.6k
  • 1.6k

SHANTAशांताप्रकाशक - अंकुश शिंगाडे१२२ बी गजानन नगर भरतवाडा कळमना मार्केट रोड नागपूर ४४००३५मुल्य - ६० ₹प्रथमावृत्ती ०१/०१/२०२१मुखपृष्ठ - कु. अनुष्काशांतासारख्या शोषीतांना सादर समर्पीतमनोगत 'शांता' ही कादंबरी वाचकाच्या हातात देतांना मला अत्यंत आनंद होत आहे. शांता हे पात्र मुळातच एक उपेक्षीत पात्र आहे. मी ही कादंबरी साकार करण्यापुर्वी अख्खं रामायण अनेकवेळा पाहिलं. परंतू मी त्या रामायणाकडे मनोरंजन दृष्टिकोणातून पाहिलं. एका चिकित्सक दृष्टिकोणातून नाही. मलाही रामायण आवडतं ते केवळ एक बोधकथा म्हणून. ती बोधकथा साकारतांना मला अगदी आनंदही वाटला. वाचकांना मी आधीच सांगून ठेवतो की ही कादंबरी एक काल्पनीक दृष्टीनं लिहिलेली असून यातील काही गोष्टी ह्या काल्पनीकच आहेत. त्याचा उगाच बाऊ करु