मृत्युदंड कादंबरी

  • 4.4k
  • 1
  • 1.8k

मनोगत मृत्यूदंड ही माझी कादंबरी वाचकांसमोर प्रस्तूत करतांना मला अत्यंत आनंद होत आहे. ही पुस्तक म्हणजे एक भावना आहे. ही पुस्तक एकलव्यावर आधारीत असून बराचसा भाग मी एकलव्याचा घेतलेला आहे. कोणी म्हणतात की गुरु द्रोणाचार्यनं गुरुदक्षीणा म्हणून अंगठा मागतांना पक्षपात केला. परंतू ती कृती काही अंशी चूक असली तरी नाण्याच्या दोन बाजूनुसार सखोल विचार केल्यास बरोबरही वाटते. त्याचं कारण म्हणजे पोट. पोटासाठी माणूस चोरीही करतो. असो. तो आपला मुद्दा नाही. मुळात कादंबरीतून मी त्याच गोष्टीची उकल केली. मी लिहिलं की यात द्रोणाचार्य दोषी नाही. दोष होता अर्जूनाचा. कारण त्यानंच एकलव्याचे करतब पाहताच म्हटलं होतं, " गुरुवर्य, आपण मला वचन दिलं