जखम कादंबरी

  • 3.7k
  • 1.6k

मनोगत जखम नावाची कादंबरी वाचकांच्या हातात देतांना मला अत्यंत आनंद होत आहे. या कादंबरीत एकूणच विद्यार्थ्यांच्या जीवनावर केलेलं चिंतन आहे. यात विद्यार्थ्यांच्याच हिताचे काही लेख नाही तर इतरही लेख आहेत. परंतू ते जरी असले तरी केंद्रस्थानी विद्यार्थी ठेवूनच लिहिलेली कादंबरी आहे. ही कादंबरी लिहिण्याचा मुख्य उद्देश होता विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणणे. त्यासाठी सरकारच्या काही ध्येय धोरणावरही मी ताशेरे ओढलेले आहेत. याचा अर्थ असा नाही की मी सरकारी ध्येय धोरणाच्या विरोधात आहे. परंतू शिक्षणाचं उद्दीष्ट राबवितांना सरकारचं काय चूकतं यावर मी या कादंबरी रुपानं प्रकाश टाकलेला आहे. व्यतिरीक्त काही उपायही सूचवले आहेत. या कादंबरीतून विद्यार्थ्यांना कसे शिकवावे? मुलांना शाळेत का पाठवावे?