कोहीनूर

  • 3.5k
  • 1.7k

मनोगत कोहीनूर नावाची कादंबरी वाचकांना देत असतांना मला अतिशय आनंद होत आहे. कोहीनूर लिहिण्यामागे प्रेरणा ही माझे मित्र सुनिल वाडे यांची असून मी यापुर्वी भानुमती कादंबरी लिहिल्यानंतर सहज माझे मित्र सुनिल वाडे यांना फोन केला आणि सहजच विषय विचारला असता त्यांनी सांगीतलं की कोहीनूर या विषयावर एखादी कादंबरी लिहा. मी लगेच मनात ठाणलं की आपण कोहीनूर या विषयावर कादंबरी लिहावी. लगेच विचार करुन मी त्याचं कथानक मनात तयार केलं व ही कादंबरी साकार केली. खरं तर मी ही कादंबरी लिहिली असली तरी तो विषय देणं आणि त्या विषयासंदर्भात प्रेरणा देणं महत्वाचं असतं. ते काम सुनिल वाडे यांच्या रुपानं झालं. त्यांचे