कसारा लोकल N11

  • 4.9k
  • 2.3k

कसारा लोकल N 7 आज ऑफिस मधून लवकर निघालो होतो, CSMT ला आलो तेव्हा पंचवटी एक्सप्रेस च्या आधी सुटणारी ०४:५२ ची कसारा मिळाली म्हणजे संध्याकाळी ०७:३० ते ०८:०० पर्यंत नक्कीच पोहचणार होतो , मग मित्रां ची पण भेट होणार होती, CSMT ला मस्त गरम गरम कॉफी, समोसा वाचायला मोबाईल मॅगझीन, व अधून मधून तोंडात टाकायला वेफर इ0 घेऊन मी कसारा पकडली. जर तुम्ही लोकल न नियमित प्रवास करणारे असाल तर कुठली up लोकल CSMT इथे आल्यावर ठाणे ,की अंबरनाथ की टिटवाळा down म्हणून लागते हे लोकल ने प्रवास करणार्यांना समजत, लोकल च्या नंबर वरून ते ओळखता येत ही त्यातील ट्रिक.