गीत रामायणा वरील विवेचन - 55 - मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे?

  • 2.9k
  • 957

सीता देवीचे डोहाळे ऐकून लवकरच आपण ते पूर्ण करू असे श्रीराम वचन देतात. आपला दैनंदिन राज्यकारभार पाहत असताना श्रीरामांनी अयोध्येत आपले हेर पेरून ठेवले होते जेणेकरून प्रजेच्या मनातील विचार आणि हाल हवाल कळावे म्हणून. एके दिवशी श्रीरामांचा हेर भद्र श्रीरामांना भेटून प्रजेचा वृत्तांत सांगतो. "बोल भद्रा! आपल्या राज्यातील प्रजा सुखात आहे न? काही अडचण तर नाहीये न त्यांना?",श्रीराम"नाही राजन! सगळी प्रजा सुखात आहे कुठेही काही दैन्य नाही, सगळीकडे समृद्धी, समाधान नांदत आहे. परंतु....",असे म्हणून भद्र खाली मान घालून गप्प बसतो. "परंतु काय भद्रा? निःशंकपणे सांग!",श्रीराम त्याला आश्वस्त करतात."प्रभू सांगायलाही संकोच वाटतो पण काही ठिकाणी माणसांच्या घोळक्यात मी काही अप्रिय विषय