गीत रामायणा वरील विवेचन - 53 - प्रभो मज एकच वर द्यावा

  • 2.9k
  • 918

{तुलसीदास कृत तुलसी रामायण हे श्रीरामांच्या राज्यभिषेकानंतरच संपते. उत्तर रामायण त्यात नाही तसेच सीता देवींनी जी अग्निपरीक्षा दिली त्याबद्दल तुलसीदासांचे असे मत आहे की रावणाच्या कैदेत जी सीता होती ती खरी नसून सीतेची प्रतिकृती होती खऱ्या सीता देवी अग्नी कडे सुरक्षित होत्या म्हणून रावणाच्या वधानंतर खोटी सीता अग्नीत प्रवेशली आणि खरी सीता अग्नी देवाने श्रीरामांना अर्पण केली. गीतरामायण हे वाल्मिकी रामयणावर आधारित असल्याने ह्यात उत्तर रामायण आहे तसेच मागील ५१ व्या गीतात नमूद केल्या प्रमाणे अग्निपरीक्षा सुद्धा आहे.}श्रीरामांचा राज्याभिषेक सोहळा आनंदात पार पडल्यावर सगळे आप्त मंडळी श्रीरामांचा निरोप घेतात. सुग्रीव,विभीषण ह्यांना भेटवस्तू देऊन श्रीराम निरोप देतात. "सुग्रीवा तू माझ्या भावप्रमाणेच