गीत रामायणा वरील विवेचन - 51 - लोकसाक्ष शुद्धी झाली सती जानकीची

  • 2.7k
  • 882

रामांनी असे म्हंटल्यावर सीता देवींना धक्का बसतो,अतीव दुःख होते त्या लक्ष्मणास अग्नी पेटवण्यास सांगतात. श्रीरामच जर मला स्वीकारणार नसतील तर माझं जीवन व्यर्थ आहे माझा जगून उपयोग नाही त्यामुळे मी अग्नीत देहसमर्पण करते असे म्हणून सीतादेवी अग्निप्रवेश करतात. लक्ष्मण,सुग्रीव,हनुमान सगळ्यांना अत्यंत दुःख होते. श्रीरामांना ही अतीव दुःख होते पण ते नियमबद्ध असतात त्यामुळे मनातल्या मनात अश्रू ढाळून स्तब्ध असतात. थोड्याचवेळात आश्चर्य होते. स्वतः अग्निदेव सीता देवींना सुखरुप घेऊन येतात आणि श्रीरामांना सांगतात,"प्रभू आपली जानकी शुद्ध,निष्कलंक आहे. तिचा स्वीकार करा."तेव्हा श्रीरामांच्या डोळ्यातून आणि तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागतात. श्रीराम म्हणतात,"सगळ्यांच्या साक्षीने जानकी शुद्ध आहे हे सिद्ध झालं आहे