गीत रामायणा वरील विवेचन - 49 - भूवरी रावण वध झाला

  • 2.8k
  • 906

राम निराश झालेले असतात ते विभीषणाला तसेच सारथी मातली ला रावणाला काही वरदान मिळालं आहे का हे विचारतात. तेव्हा इंद्र सारथी मातली त्यांना अगस्ती ऋषींनी दिलेला बाण वापरायचा सल्ला देतो आणि विभीषण दूताकरवी रावणाच्या नाभीत अमृत कुपी असून त्याला नाभीत बाण मारल्यावरच त्याचा मृत्यू होईल असा निरोप देतो. ते ऐकून रामांच्या मनात आशा निर्माण होते. ते अगस्ती ऋषींनी दिलेला बाण रावणाच्या नाभीत मारतात आणि रावण धनुष्यासकट कोसळून धारातीर्थी पडतो. रावण मेलेला पाहून राक्षस इकडे तिकडे पळू लागतात. वानर सेना त्यांच्यावर तुटून पडते. राक्षसांचा बिमोड होतो. वानर सेना विजयोत्सव साजरा करते. वरून आकाशातून देव,गंधर्व पुष्पवृष्टी करतात. सगळे मुनी ऋषी श्रीरामांना आणि