गीत रामायणा वरील विवेचन - 42 - सेतू बांधा रे सागरी

  • 2.5k
  • 915

हनुमान श्रीरामांकडे देवी सीता ची ख्याली खुशाली कळवायला आले. त्यांनी श्रीरामांना सीता देवींनी ओळख म्हणून दिलेला मणी दिला. तो पाहून श्रीराम हर्षोल्हासित झाले व त्यांनी हनुमानाला आलिंगन दिले."हनुमंता! कशी आहे माझी सीता? माझ्या आठवणीत तिने नक्कीच दुरावस्था करून घेतली असेल. रावणाने तिला काही त्रास तर दिला नाही न?",श्रीरामतिकडे लंकेत सीता देवीचे शंकानिरसन केल्यावर इकडे हनुमान रामांची शंकानिरसन करत म्हणाले,"प्रभू! आपण म्हंटल त्याप्रमाणे त्यांनी आपल्या विरहात वाईट अवस्था तर करून घेतली आहे आणि त्या राजप्रसादात न राहता अशोकवाटिकेत एका वृक्षाखाली राक्षसिणीच्या गराड्यात राहत आहेत. तिथे एक त्रिजटा नामक राक्षसींन सीता देवींकडे लक्ष देण्याचे काम करते ती जरी राक्षसींन असली तरी सीता