गीत रामायणा वरील विवेचन - 41 - पेटवी लंका हनुमंत

  • 2.4k
  • 885

सीता देवींचा निरोप घेऊन हनुमान अशोक वाटिकेच्या दुसऱ्या भागात आले. तिथे विविध प्रकारची चविष्ट फळे बघून त्यांना भुकेची जाणीव झाली. त्यांनी तिथे पोटभर गोड रसाळ फळे खाल्ले. त्यांच्या मनात विचार आला की ज्या कामासाठी आपण आलो होतो ते तर निर्विघ्नपणे झालं आहे मग आता जाता जाता रावणाला एक धोक्याचा इशारा द्यायला काय हरकत आहे म्हणून त्यांनी संपूर्ण वाटिकेची नासधूस केली. ते बघून तिथले पहारेकरी हनुमानाच्या अंगावर धावून आले पण त्यांचा हनुमानाने लीलया(सहज) बिमोड केला. ते पाहून पहारेकरी दरबारात तक्रार करायला गेले. "दैत्यराज! वाचवा दैत्यराज वाचवा! त्राहिमाम! वाटीकेत एक महाकाय वानर उत्पात माजवत आहे. त्याने सगळ्या फळफुलांची नासधुस आरंभली आहे.",पहारेकरी"एक क्षुद्र