गीत रामायणा वरील विवेचन - 39 - नको करुस वल्गना रावणा

  • 2.4k
  • 948

हनुमानाची खात्री पटते की हीच श्रीरामांची स्वामिनी आहे. पण तरीही एकदम सीता देवींच्या समक्ष उभे राहण्याचा त्यांचा धीर होत नाही. हनुमानास वाटते की सीता देवींनी आपल्याला कधीही याआधी पाहिलं नाही तसेच सुग्रीव व श्रीराम यांच्या मैत्रीबद्दलही त्यांना ठाऊक नाही. अश्या परिस्थितीत मी जर अचानक समोर गेलो तर रावणानेच एखादे मायावी रूप घेतले असावे व तोच समोर उभा ठाकला आहे असे सीता देवींना वाटू शकते. हनुमंत असा विचार करतच होते तेवढ्यात सेवकांच्या गराड्यात रावण तिथे येऊन ठेपला आणि सीता देवींसमोर उभा राहिला व म्हणाला,"सीते! अशी किती काळ इथे खितपत पडणार आहे? अजूनही तुला आशा वाटते की तुझा राम येईल म्हणून? अगं!