गीत रामायणा वरील विवेचन - 36 - वाली वध ना खल निर्दालन

  • 2.6k
  • 933

वालीला ब्रम्हदेवाकडून असा वर मिळाला असतो की जो ही त्याच्यासमोर युद्धास उभा ठाकेल त्याची अर्धी शक्ती वालीला मिळेल. त्यामुळे वाली कधीच कोणाशी हरत नाही. अशी माहिती जांबुवंत हा सुग्रीवाचा ज्येष्ठ मंत्री असतो तो श्रीरामांना देतो. त्यामुळे श्रीराम अशी योजना आखतात की सुग्रीवाने वालीला युद्धासाठी आमंत्रण द्यायचं आणि रामाने त्याच्या पुढे न येता एका वृक्षा आडून बाण मारायचा.श्रीरामांच्या सांगण्यावरून किष्किंदा नगरीत जाऊन सुग्रीवाने वालीला युद्धासाठी आव्हान केले,"वाली बाहेर ये! तुझा काळ तुला बोलावतोय असे समज! भावाच्या बायकोला पळवणार्या अधमा! बाहेर ये! मी सुग्रीव तुला युद्धासाठी आमंत्रण देतोय. ",सुग्रीव म्हणालाते ऐकून वाली चिडून बाहेर आला,"अरे भ्याडा! एवढा काळ ऋषयमुक पर्वतावर लपून बसलेला